दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
(1) 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात?
(2) भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो?
(3) मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा.