List of top Social Science Questions asked in Maharashtra Class X Board

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा : 
उतारा : 
खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुंसंयोजित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, भालाफेक, झेप व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळांची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जात असे. 
प्रश्न : 
(1) प्राचीन ऑलिंपिक खेळांची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे? 
(2) खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे? 
(3) ऑलिंपिक स्पर्धांविषयी आपले मत मांडा.