'खालील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शविणारी नामनिर्देशित आकृती काढा : ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे (द्रवणांक 2000°C) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्रॅफाईटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या अपघटंनी पदार्थात बुडविलेल्या कार्बन (ग्रॅफाईट) च्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रवणांक 1000°C पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाईट (Na_3AlF_6) व फ्ल्युअरस्पार (CaF_2) मिसळले जाते.