माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड. ' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर !" अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. “दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.
लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द
\(\downarrow\)
.............
\(\downarrow\)
.............