जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
योग्य जोडी जुळवा :
खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा : पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
सहसंबंध लिहा : त्वचा : मेलेनिन : : स्वादुपिंड : _______
गटातील वेगळा शब्द ओळखा : डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीपॅटस
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
महाराष्ट्रात _________ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
जनुकातील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला _______ असे म्हणतात.
लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ______हे पेय तयार केले जाते.
पुनर्जनन पद्धती ______या प्राण्यात आढळते.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अम्लीय ऑक्साइड कोणत्या एका उपयोग लिहा.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणे उत्पादने मिळतील ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : चुनाच्या निवळीत रंगात काय बदल होतो ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : वरील अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचे नावे लिहा.
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा सर्वांत कमी विचलन झालेला रंग कोणता ?
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा सर्वांत जास्त विचलन झालेला रंग कोणता ?
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे ?
जर त्यातील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्याच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल होऊन येईल ?
दोन वस्तूंपासून अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल ?