Question:

दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. 
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया] 
समुद्रात विविध कारणांनी _______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ________ विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्यूडोमोनास जीवाणूंमध्ये _______ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात. H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ______ शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत _______ व पाणी तयार होते.

Hide Solution
collegedunia
Verified By Collegedunia

Solution and Explanation

समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलिअम तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्यूडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात. H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजन शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत $CO_2$ व पाणी तयार होते.

Was this answer helpful?
0
0